उद्योगमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांची 'मिसळ पार्टी' File Photo
रत्नागिरी

उद्योगमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांची 'मिसळ पार्टी'

खेडमध्ये लुटला मिसळ खाण्याचा आनंद

पुढारी वृत्तसेवा

खेड : पुढारी वृत्तसेवा

उद्योग मंत्री उदय सामंत हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्‍यान मंत्री उदय सामंत यांनी गृह राज्य मंत्री योगेश कदम यांच्यासोबत चक्क खेडमध्ये मिसळ पार्टी केली.

त्याचे झाले असे की, आज कोकणातील हे दोन्ही मंत्री कोकण दौऱ्यावर आहेत. सकाळी खेडमध्ये नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी उदय सामंत व योगेश कदम हे एकत्र उपस्थित राहणार होते. त्यापूर्वी त्यांनी खेडच्या जुन्या बसस्थानकासमोरील विजय उपहारगृह येथे मिसळ पाववर ताव मारला. आपल्या व्यस्त दिनचर्येत देखील त्यांनी मिसळचा आनंद लुटल्याने ही बाब चर्चेची ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT