गणपतीपुळे येथील मंदिरात ‘श्रीं’समोर केलेली हापूस आंब्यांची आरास. Pudhari File Photo
रत्नागिरी

गणपतीपुळे मंदिरात आम्रफळांची लक्षवेधी आरास

गुढीपाडव्यानिमित्त देवस्थानचा उपक्रम; मराठी नववर्षारंभानिमित्त पालखी मिरवणूक

पुढारी वृत्तसेवा
वैभव पवार

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे नववर्षाच्या प्रथम दिनी चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला मालगुंड येथील रहिवासी अनंत सुधाकर मोरे आणि मोरे परिवार यांच्याकडून श्री चरणी 21 डझन आम्रफळांची विलोभनीय आरास करण्यात आली.संस्थान श्री देव गणपतीपुळेचे मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर यांच्यामार्फत ही आरास करण्यात आली.

मंदिरात मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी आम्रफळांची आरास करण्यात आल्याने या दिवशी गणपती मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तगण व पर्यटकांसाठी ही आरास खास आकर्षण ठरली. या निमित्ताने अनेकांनी स्वयंभू श्रींच्या समोर असलेली सुंदर आरास मोबाईलमध्ये टिपत स्वयंभू श्रींचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. रविवारी गुढीपाडव्यानिमित्त संस्थान श्री गणपीपुळेकडून काढण्यात आलेल्या श्रींच्या पालखी मिरवणुकीत अनेक विविध ठिकाणांहून आलेले भक्तगण, पर्यटक तसेच स्थानिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी श्रींच्या पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचे समाधान लाभले.

सायंकाळी निघाली पालखी मिरवणूक

गणपतीपुळे मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांच्या वतीने रविवारी सायंकाळ 4.30 वाजता वाजता ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे श्रींची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी केली तसेच मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT