Mobile Tower pudhari photo
रत्नागिरी

Mobile Tower | महसूल थकबाकीमुळे दूरसंचारच्या दोन टॉवरना ठोकले टाळे

Mobile Tower | थकबाकी भरण्याच्या अटीवर पालघर व शेडवई येथील टॉवरना लावलेले टाळे उघडले

पुढारी वृत्तसेवा

मंडणगड : पुढारी वृत्तसेवा

तीन वर्षांपासूनची महसूल थकबाकी न भरल्यामुळे संबंधित दूरसंचार कंपनीच्या टॉवरला महसूल विभागाने टाळे ठोकले व कंपनीच्या थकबाकी भरण्याच्या आश्वासानंतर पुन्हा टाळे उघडण्यात आले.

यासंदर्भात मंडणगड तहसील कार्यालयाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्या आदेशाने महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात पालघर व शेडवई येथील दूरसंचार संबंधित कंपनीचे टॉवर सील केले.

त्यानंतरच्या झालेल्या घडामोडीत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून थकबाकी भरण्याच्या अटीवर अखेर दोन्ही कंपन्यांचे टॉवर संबंधित कंपनीकडे लावण्यात आलेले टाळे उघडून सुपूर्द करण्यात आले.

मंडणगड मंडळ अधिकारी नीलेश गोडघासे, ग्राम महसूल अधिकारी मयूर पंडित, उद्धव घाटूळ, सिद्धी भोयर, हिरा ठोंबरे, पोलिस कॉन्स्टेबल भोसले यांच्या पथकाने ही करवाई केली. मात्र त्यानंतर जनतेचे हित लक्षात घेता शासनाच्या धोरणाप्रमाणे विनाविलंब टॉवर संबंधित कंपनीचा ताब्यात देण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी नीलेश गोडघासे यांनी दिली. यासंदर्भात संबंधित दूरसंचार विभागाच्या प्रतिनिधींशी माहिती घेण्यासंदर्भात संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

दूरसंचार कंपनीकडून डोंगरी भाग असलेल्या मंडणगड तालुक्यामध्ये जनतेस फार हेळसांड होते. मुळात गरीब जनतेकडे फार कमी स्वरूपात मोबाईल आहे. त्यामध्ये महिन्यातून दहा ते पंधरा दिवस नेटवर्क मिळते. काही टॉवर तर नेटवर्क शिवाय उभे थाटले आहेत. कंपन्यांनी महसूल कर भरणे गरजेचे आहे. शिवाय कंपनीने जनतेचे हित लक्षात घेणे महत्वाचे आहे.
- नितीन म्हामुनकर, माजी पंचायत समिती सदस्य, मंडणगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT