मालगुंड येथे स्वयंभू जागृत श्री दुबळेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सवाला सुरूवात  Pudhari Photo
रत्नागिरी

मालगुंडमधील श्री दुबळेश्वर मंदिरात ३ दिवस चालणार महाशिवरात्रीचा उत्सव

Mahashivratri 2025 | विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा: मालगुंड येथे स्वयंभू जागृत श्री दुबळेश्वर महादेव मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्री उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त सोमवारी (दि. २४) ते गुरूवार (दि. २७) पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार (दि.२४) सकाळी ८ ते १० प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन मातृका पूजन (पंचांग कर्म), सकाळी ११ ते २ वा. द्वादशलिंग तो भद्रमंडल स्थापना, पीठ स्थापना व महारुद्र अभिषेक, दुपारी ३ ते ६ ग्रहयज्ञ, रुद्र हवन, सायंकाळी आरती आणि रात्री श्री जय संतोषी माता लोकनाट्य नमनाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. २५ रोजी सकाळी ९ ते ११ वा. स्थापित देवता पूजन, बिल्वार्चन, महारुद्र अभिषेक, दु.३ ते ६ वा. महारुद्र हवन, सायंकाळी आरती, रात्री ८ ते १२ वा. बुवा विनोद चव्हाण आणि बुवा सुशील गोठणकर यांच्या भजनाचा डबलबारी सामना होणार आहे.

बुधवार दि.२६ रोजी सकाळी ९ ते १ वा. स्थापित देवता पूजन, महारुद्र अभिषेक, दुपारी ३ ते ६ पुष्पार्चन, बिल्वार्चन, सायंकाळी आरती. सायं.७ ते ९ वा. महाकुंभ मृत्तिकेचे पूजन व महाकुंभ त्रिवेणी संगम जलाने दुबळेश्वराचा महाअभिषेक, रात्री १० ते ३ वा. महारुद्र अभिषेक, महारुद्र स्वाहाकार, बलिदान पूर्णाहुती, महाआरती होणार आहे. गुरुवार दि. २७ रोजी दुपारी १२ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वयंभू श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थान, मराठवाडी, धरणावर, वरचा वठार, मालगुंड यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT