Gang Arrest Pudhari
रत्नागिरी

Madhya Pradesh Murder Case: मध्य प्रदेशातील खूनप्रकरणी ३ फरार आरोपी रत्नागिरीत जेरबंद

रत्नागिरी शहर पोलिस गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : मध्य प्रदेशातील झाबुवा जिल्ह्यात घडलेल्या खून प्रकरणातील तीन फरार संशयितांना रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. या आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दाऊद सन ऑफ चिलिया वाकला, नब्बू सन ऑफ चिलिया वाकला आणि चिलिया सन ऑफ कलिसिंग वाकला (सर्व रा. झाबुवा, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

झाबुवा जिल्ह्यात खुनाचा गुन्हा घडल्यानंतर हे तिघेही आरोपी फरार झाले होते. हे आरोपी रत्नागिरी जिल्ह्यात लपून बसल्याची माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली. त्यानुसार विशेष पथक शनिवारी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून तिन्ही संशयितांना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलिस फौजदार दीपक साळवी, पोलिस हवालदार भालचंद्र मयेकर आणि पोलिस कॉन्स्टेबल नीलेश शिंगावे यांनी प्रत्यक्ष कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT