चिपळूण : मार्च 2025 मध्ये लव्ह जिहाद कायदा व्हावा या मागणीसाठी महिलांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात 1 लाखांहून अधिक लव्ह जिहाद च्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे सांगितले. ही वास्तव स्थिती असताना अजून पर्यंत हिंदू जनतेकडून मागणी करूनही महाराष्ट्रात या विरोधात कायदा झालेला नाही.
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद्यांना कठोर शिक्षा करणारा कायदा महाराष्ट्रात झालाच पाहिजे ही मागणी करणारे आंदोलन हिंदू जनजागृती समितीद्वारे चिपळूण येथे घेण्यात आले. खेडेकर क्रीडा संकुल समोर 10 डिसेंबर रोजी सायं 5 वाजता हे आंदोलन झाले. आंदोलनात विविध संघटना, संप्रदाय व सर्वसामान्य हिंदू महिला आणि युवतींची मोठी उपस्थिती होती.
महिला प्रतिनिधी यांनी लव जिहाद विरोधात कायदा होण्यास महाराष्ट्र शासन विलंब करत आहे, याविषयी खेद व्यक्त केला. हिंदू राष्ट्र समन्वय समिती, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, विहिप, शिवसेना, भाजप, ग्राम दैवत कालभैरव संस्कृतीक मंच, संस्कार भारती, सनातन संस्था व धर्म राष्ट्रप्रेमी हिंदू बांधव उपस्थिती होते.