कोकण पर्यटकांनी बहरले! 
रत्नागिरी

Konkan Tourism : कोकण पर्यटकांनी बहरले!

सलग सुट्ट्यांमुळे राज्यासह बाहेरील पर्यटक दाखल

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरीः शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्‍यामुळे कोकणात पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. यामुळे रत्‍नागिरीतील भाट्ये बीच, मांडवी, थिबा पॅलेस, नाचणे येथील बोट सफर, गणपतीपुळेसह तालुक्‍यात विविध सम्रुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे.

उन्‍हाळी सुट्ट्यांत राज्‍यभरातील पर्यटक कोकणात येत असतात. रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळेसह रत्‍नदुर्ग किल्‍ला, शिवसृष्टी, थिबा पॅलेस, थिबा गार्डन, भाट्ये, मांडवी बिचला पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे-नारायणमळी येथील कांदळवन सफारी, पक्षी निरीक्षण आणि कयाकिंगकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. किंगफिशर, स्वर्गीय नर्तक, ब्राह्मणी काईट धनेश यांसारख्‍या पक्ष्‍यांचे पर्यटकांना दर्शन घडत आहे. या उपक्रमामुळे येथील स्थानिकांनाही रोजगार मिळत आहे. सफारीदरम्यान पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लाईफ जॅकेट बंधनकारक करण्‍यात आले आहे. कांदळवन पर्यटनासाठी पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे.

नाचणे कांदळवन सफारी विशेष आकर्षण

महाराष्ट्रातल्या २१ कांदळवनामधील ११ कांदळवन नाचणे येथे आढळतात. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT