रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
दिवानखवटी येथे बोगद्याजवळ डोंगर खचल्याने काल (रविवार) पासून कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मातीचे ढिगारे काढण्याचे काम अद्यापही सुरू आहे. त्यामुळे विविध स्थानकात प्रवाशांसाठी रेल्वेकडून बसची व्यवस्था केली जात आहे. ज्या ट्रेन विविध स्थानकात उभ्या होत्या त्या तेथेच रद्द करण्याचा निर्णय होत आहे. प्रवाशांकरीता बसची व्यवस्था केली जात आहे.
कोकण रेल्वे दिवाणखवटी येथे बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मांडवी एक्सप्रेस दिवा पॅसेंजर यातील प्रवाशांना मुंबई येथे सोडण्याकरता उपप्रबंधक यांनी केलेल्या मागणीनुसार खालीलप्रमाणे बस पुरवण्यात येत आहेत.
रत्नागिरी स्टेशन ४० बसेस
चिपळुण स्टेशन १८ बसेस
खेड स्टेशन १० बसेस