Tirupati Shirdi Railway Pudhari Photo
रत्नागिरी

Konkan Railway Protest 2026 | प्रलंबित मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक

Konkan Railway Protest 2026 | वंदे भारतला अधिक थांबे, भूमिपुत्रांना रेल्वेमध्ये रोजगार मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

कोकण रेल्वे मार्गावरील विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. वंदे भास्त आणि सुपरफास्ट गाड्यांना अधिक थांबे देणे, वेळापत्रकात सुधारणा करणे, स्थानकांवरील स्वच्छता व मूलभूत सुविधा वाढवणे तसेच कोकणातील भूमिपुत्रांना रेल्वेमध्ये प्राधान्याने रोजगार देण्याच्या मागण्यांसाठी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असले तरी अनेक महत्त्वाच्या गाड्यांना कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबा मिळत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः वंदे भारत, तेजस आणि अन्य सुपरफास्ट गाड्यांना रत्नागिरी, चिपळूण, खेड, संगमेश्वर रोड, सावर्डे यांसारख्या स्थानकांवर थांबा देण्याची मागणी जोर धरत आहे. अनेक प्रवाशांना लांब अंतरावर जाऊन गाड्या पकडाव्या लागत असल्याने मनस्ताप सहन आहे.

करावा लागत असल्याचे संघटनांचे म्हणणे याशिवाय कोकण रेल्वेवरील अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात वारंवार होणारे बदल, उशिरा धावणाऱ्या गाड्या आणि अपुऱ्या डब्यांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यटन हंगामात आणि सणासुदीच्या काळात गर्दी वाढत असतानाही अतिरिक्त गाड्या व डब्यांची व्यवस्था अपुरी असल्याची टीका प्रवासी संघटनांनी केली आहे.

स्थानकांवरील स्वच्छता, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि पार्किंग सुविधा याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काही स्थानकांवर मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने प्रवाशांना गैरसोय होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोकण रेल्वे प्रकल्पासाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या.

मात्र रोजगाराच्या बाबतीत भूमिपुत्रांना न्याय मिळत नसल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे. स्थानिक युवकांना रेल्वेतील विविध पदांवर प्राधान्याने संधी द्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रवासी संघटनांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT