आंबोली मुख्य धबधब्याजवळ कोसळला खडक 
रत्नागिरी

Ratnagiri News : आंबोली मुख्य धबधब्याजवळ कोसळला खडक

वाहन चालकांत भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

आंबोली : आंबोली घाटमार्गातील मुख्य धबधब्याजवळ अचानक डोंगर कड्यावरील एक मोठा दगड रस्त्यावरून थेट दरीत कोसळला. दुसऱ्या एका मोठ्या दगडाचे काही तुकडे रस्त्यावर राहिल्याने काही काळ वाहतूक संथ गतीने चालू होती. सुदैवाने त्यावेळी कोणतेही वाहन तेथे नसल्याने दुर्घटना टळली. ही घटना रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.

आंबोली परिसरात गेले दोन दिवस पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून, यंदाच्या वर्षा हंगामातील दरडीतील दगड कोसळण्याची ही पहिलीच घटना होय. पावसाळी पर्यटन हंगामाच्या सुरुवातीला अशी घटना घडल्याने पर्यटकांत तसेच वाहन चालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. अजूनही असे बरेचसे मोठे दगड घाटमाथ्यावरील बाजूस असून, ते कधीही रस्त्यावर येऊ शकतात. खाली येण्याची शक्यता असलेले दगड वेळीच बाजूला करावेत, जेणेकरून भविष्यात एखादा अनुचित प्रकार घडणार नाही, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT