संग्रहित फोटो 
रत्नागिरी

Konkan rain : कोकणात तीन महिन्यांत 99 टक्के पाऊस!

1 जून ते 3 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण 29 हजार 862 मि.मी. पावसाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात तीन महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे 1 जून ते 3 सप्टेंबर या कालावधीत 29 हजार 862.76 मि.मी पावसाची नोंद झाली असून 99 टक्के इतका पाऊस झाला आहे. खेड, चिपळुण, राजापूर तालुक्यांनी पावसाचे शतक पूर्ण केले आहे. गतवर्षी याच कालावधीत 109.91 टक्के इतका पाऊस झाला होता तसेच 9 तालुक्यांने पावसाचे शतक पार केले होते.गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली असून पर्जन्यमानचा जो फरक होता कमी झाला असून लवकरच गतवर्षाच्या तुलने एवढा किंवा जास्त पडण्याची शक्यता आहे.

कोकणात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणतल्या इतिहासात प्रथमच मे महिन्यात इतका पाऊस झाला.त्यानंतर जूनमध्ये मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली.जून व जुलै महिन्यात पाऊस धो -धो पडला. त्यामुळे दोन्ही महिने लकी ठरले होते. उशिरा सुरू झालेल्या भात पेरण्या पूर्ण झाल्या. दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे सार्वजनिक मालमत्ता,घरांची पडझड, व्यक्तींचा, जनावरांचा मूत्यू झाला. कित्येक ठिकाणी रस्ते खचले, दरड कोसळली त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे नुकसान झाले. वाहनधारकांना मोठा त्रास सहन करून वाहतूक करावी लागली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पर्यजन्यमान 14 टक्क्यांने कमी झाले होते. दुसर्‍या आठवड्यात पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले होते. तीन ते चार तालुक्यात पूरपरिस्थती निर्माण झाली होती. नद्यांनी धोकादायक, इशारा पातळी ओलांडल्यामुळे जिल्हा प्रशासनाने शाळा-महाविद्यालयांन सुट्टी जाहीर केली होती. प्रशासन सतर्क झाले होते. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आण़ि नद्यांची पातळी कमी होवून पूरपरिस्थिती निवळी. गणेशचतुर्थी दिवशी पुन्हा पावसाने हजेरी लावली सलग चार दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गतवर्ष व यंदाच्या पर्जन्यमानात थोडासा फरक राहिला असून गतवर्षाची सरासरी यंदाचा पाऊस गाठण्याची शक्यता आहे.

पावसामुळे कोट्यवधीचे नुकसान

मागील तीन महिन्यात पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले होते. त्यामुळे शेती, सार्वजनि मालमत्ता, शाळा, घरे, गोठे, संरक्षक भिंत यासह विविध कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. तसेच काही व्यक्तींचा वीज पडून मूत्यू झाला तर काही जनावरांचा ही मूत्यू झाला. काहींना नुकसान भरपाई मिळाली आहे. तसेच शेतकर्‍यांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT