रत्नागिरी: अनंत चतुर्दशीला उघडीप घेतलेला पाऊस बुधवारीही गायब झाला. त्यामुळे वातावणात कोरडेपाणा येऊन तापमानही वाढले. पावसाने गेले दोन दिवस उघडीप घेतली असून आठवडाभर पाऊसाचा जोर ओरण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मात्र, त्यामुळे तापमान वाढणार असल्याने खरीप क्षेत्रात उभे पीक करपण्याची भीती आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता रत्नागिरी शहर परिससरात तापमान २९ अंश सेल्सिअस होते. ते दुपारी १२ वाजता ३० अंश सेल्सिअसवर गेले. जिल्ह्यात संपलेल्या २४ तासात अपवादात्मक सरींची हजेरी वगळता पावसाने दडी मारली. केवळ १.१४ मि.मी.च्या सरासरीने एकूण केवळ १० मि.मी. पावसाची नोंद झाली.