रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त काहीजण दहा दिवस सुट्टी घेऊन कोकणातील गावी येत असतात तसेच काहींना सुट्टी मिळत नसल्यामुळे शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे गौराइ सर्णाबरोबरच गणेश विसर्जनपर्यंत सुट्टी घेऊन मुंबईतून रत्नागिरीत रविवारी दाखल झाले आहेत. सकाळी 10 च्या सुमारास रेल्वेस्थानकाबाहेर चाकरमान्यांची मोठी गर्दी दिसून आली.
गणेशोत्सवानिमित्त कोकणकर हमखास सुट्टी घेवून कोकणात येत असतो. यंदाच्या वर्षी लाखोंच्या संख्येने चाकरमानी रेल्वे, एसटी, खासगी बस, चारचाकीने जिल्ह्यात दाखल झाले. तसेच काहींना सुट्टी न मिळाल्यामुळे तसेच विविध कारणास्तव गौराई सण ते विसर्जनपर्यंत सुट्टी घेऊन रविवारी चाकरमानी रेल्वे रत्नागिरीत दाखल झाले आहेत. मोठ मोठ्या बॅगा घेवून रेल्वे स्टेशन परिसरात एसटीची वाट पाहत होते. वेळेवर एसटी बसेस न आल्यामुळे वडाप अन्य खासगी वाहनाने आपआपल्या गावी चाकरमानी पोहोचले आहेत.