खेडमध्ये शिंदे शिवसेनेचा दबदबा 
रत्नागिरी

Khed Panchayat Samiti Results : खेडमध्ये शिंदे शिवसेनेचा दबदबा

जि. प. गटात 7 पैकी 6 जागांवर विजय

पुढारी वृत्तसेवा

खेड : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अंतिम निकालात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शिंदे शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्हा परिषदेत एकूण 7 पैकी 6 जागांवर शिंदे सेनेचा भगवा फडकला तर 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मिळाली. भाजप, उद्धव ठाकरे शिवसेना व काँग्रेसला जिल्हा परिषदेत खाते उघडता आले नाही. पंचायत समितीच्या 14 पैकी 10 जागा शिंदेच्या शिवसेनेने, 3 उद्धव सेनेने तर 1 जागा राष्ट्रवादीने जिंकली आहे. खेड पंचायत समितीवर शिंदे शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

जिल्हा परिषद गटनिहाय निकाल

सुकिवली गटात सचिन धाडवे (शिंदेसेना) (6851) यांनी रामचंद्र आखाडे (उबाठा) (2629) यांचा पराभव केला तर भरणे गटात मानसी जगदाळे (शिंदेसेना) (6476) यांनी सुहासिनी चिंचघरकर (उबाठा) (2457) यांच्यावर मात केली. भडगाव गटात अजय बिरवटकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) (7119) विजयी ठरले. रवींद्र रेवाळे (शिंदेसेना) (6107) यांना पराभव स्वीकारावा लागला.दयाळ गटात अरुण कदम (शिंदेसेना) (6458) यांनी अजिंक्य मोरे (उबाठा) (4438) यांचा पराभव केला तर विराचीवाडी गट रेवती पाटील (शिंदेसेना) (5421) यांनी स्पृहा चांदिवडे (उबाठा) (3254) व अंजली खापरे (राष्ट्रवादी अजित पवार) (2045) यांना मागे टाकले. लोटे गटात आदिती खाडे (शिंदेसेना) (4212) यांनी अंकिता सोलकर (उबाठा) (4159) यांच्यावर विजय मिळवला. धामणदिवी गटात जाई आंब्रे (शिंदे सेना) (4939) विजयी ठरल्या. सानिका आंब्रे (राष्ट्रवादी अजित पवार) (3325) व प्रीती मनवळ (उबाठा) (2835) यांना पराभव पत्करावा लागला.

पंचायत समितीतही शिंदे सेनेची सरशी

पंचायत समितीच्या 14 जागांपैकी 10 जागांवर शिंदे सेनेने विजय मिळवला. उद्धव ठाकरे शिवसेनेला 3 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना 1 जागा मिळाली.

पं. स. गणनिहाय निकाल

सुकिवली-सुनिता कासार (शिवसेना) (3459) विजयी.

तिसंगी-महेश भोसले (शिवसेना) (2812) विजयी.

खवटी-नम्रता तांबट (शिवसेना) (2768) विजयी.

भरणे-प्रशांत चव्हाण (शिवसेना) (2874) विजयी.

भडगाव-संग्राम कदम (शिवसेना) (3782) विजयी.

जामगे अपूर्वा जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) (3946) विजयी.

दयाळ शमिका म्हादे (शिवसेना) (2158) विजयी.

बहिरवली निसार सुर्वे (शिवसेना) (3038) विजयी.

गुणदे सुनील मोरे (शिवसेना) (2270) विजयी.

वीराचीवाडी- दिलीप डेरवणकर (शिवसेना) (2753) विजयी. लोटे-अजय चाळके (उबाठा) (2384) विजयी. आंबडस अमिता बने (उबाठा) (1749) विजयी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT