खेड : कोकण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसाने खेड येथील जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. प्रशासनाने केलेल्या नोंदीनुसार गेल्या 24 तासांत खेडमध्ये 42 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट आहे. ग्रामीण भागातील शेतकाम ठप्प झाले आहे.
खेड शहरासह ग्रामीण भागाला शनिवार, दि. 1 रोजी पावसाने झोडून काढले. कृषीशी संबंधित कामे, बाजारपेठ आणि सार्वजनिक वाहतूक या सर्वच क्षेत्रांवर पावसाचा परिणाम दिसून येत आहे. छोट्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. ग्रामीण भागात पिके वाचवण्यासाठी शेतकर्यांकडून प्रयत्न सुरू असून, सरकारी उपाययोजनांची देखील मागणी होत आहे.