Khed Accident | दुचाकीला ट्रकची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, मुलगी जखमीः संतप्त ग्रामस्थांनी केला रास्तारोको 
रत्नागिरी

Khed Accident | दुचाकीला ट्रकची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, मुलगी जखमीः संतप्त ग्रामस्थांनी केला रास्तारोको

खेड– दापोली मार्गावर फुरूस गावाजवळ भीषण अपघात, घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण

पुढारी वृत्तसेवा

खेड: खेड– दापोली मार्गावर फुरूस गावाजवळ गुरुवारी (दि. १९) सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली एक मुलगी जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार सचिन गणू खामकर ( रा. फुरुस चौगुलेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या मुलीला तत्काळ फुरूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, ट्रक चालकावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत रस्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला असून घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT