Uday Samant Pudhari Photo
रत्नागिरी

Ratnagiri News| विद्यार्थ्यांना रत्‍नागिरीत केंद्रीय विद्यालयाचा पर्याय खुला

विद्यार्थ्यांंचे प्रवेश निश्‍चित करण्‍याचे पालकमंत्री सामंत यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : केंद्रीय विद्यालय, रत्नागिरी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक सुवर्णसंधी असून, जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन उद्योग तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केले आहे. ‘शिक्षण हाच खरा विकास" हा विचार समोर ठेवून, मुलांच्या गुणवत्तेला व भविष्याला आकार देण्यासाठी पालकांनी पुढे यावे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी पासपोर्ट आकाराचा फोटो, जन्म दाखला, जन्मतारखेचा पुरावा (३१ मार्च २०२६ रोजीच्या वयानुसार), आधार कार्ड, रक्तगटाचे प्रमाणपत्र आणि निवासाचा दाखला सोबत ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय लागू असल्यास EWS प्रमाणपत्र किंवा BPL कार्ड, SC/ST/OBC-NCL जात प्रमाणपत्र, सेवा प्रमाणपत्र व बदल्यांच्या संख्येबाबतचे प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तसेच इतर पूरक कागदपत्रे जोडायची आहेत.

प्रवेश निश्चित झाल्यानंतर मागील इयत्तेचा शाळा सोडल्याचा दाखला (टी. सी.) आणि गुणपत्रक जमा करावे लागेल. प्रवेशाबाबत अधिक माहिती आणि संपर्कासाठी पालकांनी केंद्रीय विद्यालय, लोकमान्य टिळक, नगर परिषद शाळा क्रमांक २, रत्नागिरी - ४१५६३९ येथे भेट द्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT