Jal Jeevan Mission 
रत्नागिरी

Ratnagiri News : अबब... जलजीवनच्‍या १,४२८ योजनांमध्ये ९५६ त्रुटी!

रत्‍नागिरी तालुका प्रलंबित आक्षेपामध्ये अव्वल; जिल्‍हा परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : कोकणातील रत्‍नागिरी जिल्‍ह्यात सुरू असलेल्‍या जलजीवन मिशन योजनांच्‍या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या पथकाने २ हजार ११ वेळा केलेल्‍या प्रत्‍यक्ष पाहणीत ९४६ गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. त्‍यापैकी ८८४ आक्षेप प्रशासनाने निकाली काढले असले तरी ७२ आक्षेपांची पूर्तता अद्याप झालेली नाही. या दिरंगाईबद्दल जिल्‍हा परिषदेच्‍या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

जिल्‍ह्यात जलजीवनच्‍या १ हजार ४२८ योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. तपासणी दरम्‍यान निकृष्ट काम, कागदपत्रे अपूर्ण व तांत्रिक चुका अशा नऊ प्रकारच्‍या त्रुटी आढळल्‍या. विशेषत: रत्‍नागिरी तालुक्‍यातील चित्र चिंताजनक आहे. येथे १८२ योजनांच्‍या तपासणीत १४९ त्रुटी आढळल्‍या असून त्‍यापैकी तब्‍बल २४ आक्षेप अजूनही प्रलंबित आहेत, जे जिल्‍ह्यात सर्वाधिक आहेत. तसेच दुसरीकडे मंडणगड तालुक्‍याने मात्र सर्वांसमोर चांगला आदर्श घालून दिला आहे. १०४ योजनांच्‍या तपासणीत आढळलेले सर्व ७६ आक्षेप या तालुक्‍याने १०० टक्‍के पूर्ण केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT