गुहागर शहर : तालुक्यातील कुटगिरी गावठाणानजीक असलेला लोखंडी साकव सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता कोसळून त्याखाली अडकून एका बैलाचा मृत्यू झाला असून अन्य ६ जनावरे गंभीर जखमी झाल्याची माहिती गुहागर आपत्ती विभागाकडून प्राप्त झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मंडल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच जि. प. बांधकाम उपअभियंता व पशुवैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचनादेखील गुहागर आपत्ती विभागाकडून देण्यात आल्या. दरम्यान, या दुर्घटनेत ठार झालेल्या बैलासह जखमी ६ जनावरे बाहेर काढण्यात आली आहेत.