कोकणच्या अंगणी शेकरू लागले बागडू! Pudhari Photo
रत्नागिरी

कोकणच्या अंगणी शेकरू लागले बागडू!

भांबेड येथे 'महाराष्ट्र राज्य पशु' दर्जा मिळालेले शेकरू आढळले

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : दीपक शिंगण

लांजा तालुक्यातील भांबेड येथील एका बागेत 'महाराष्ट्र राज्य पशु' दर्जा मिळालेले शेकरू बागडताना आढळले आहे. कोकणच्या समृद्ध निसर्गसंपदेसाठी हे शुभ संकेत मानले जात आहेत. मोठी खारुताई म्हणून ओळख असलेले शेकरू ही लोप पावत चाललेल्या प्रजातीमधील खार आहे.

मुंबईस्थित भाजप जिल्हा उपाध्यक्ष नवल शेवाळे यांच्या बागेत महाराष्ट्र राज्य पशु शेकरूचे दर्शन झाले. या शेकरूला झाडांवर बागडताना चे दृश्य नवल शेवाळे यांनी टिपले आहे. वन पर्यावरण आणि प्राणी प्रेमींसाठी ही सुखद बातमी आहे. लांजा वनपाल दिलिप आरेकर यांनी चित्रित केलेल्या चित्रफितीत दिसणारा प्राणी शेकरू असल्याचे सांगितले. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पशु आहे. उडती खार ही खारीची प्रजात आहे.

शेकरू (उडती खार; शास्त्रीय नाव: Ratufa indica, रॅटुफा इंडिका ; इंग्लिश: Indian giant squirrel, इंडियन जायंट स्क्विरल) ही खारींची एक प्रजाती आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे. शेकरू हा पशु भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो. भांबेड येथील नवल शेवाळे हे मुंबईत नोकरी निमित्त स्थायिक आहे. मुळगाव भांबेड मुंबई येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यांनी गावी काजू आणि आंबा याची बाग जोपासली आहे. लांजा पूर्व विभाग सह्याद्रीच्या पायथ्याशी येतो. पूर्व भागात खोरनिनको, प्रभान वल्ली, भांबेड या गावात जंगल वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी आंबा घाटात जंगल परिसरात शेकरू हा प्राणी आढळत असे. भीमाशंकर पर्वत भागात शेकरूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, परंतु हळूहळू या प्राण्याचे प्रजनन कमी होत गेले आहे.

मी दोन दिवसापूर्वी मुंबई येथून भांबेडगावी आलो होतो. बागेत गेल्यानंतर मला एक वेगळा प्राणी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत असल्याचे पाहिले. कुतूहल वाढून त्याला कॅमेऱ्यात कैद केले.

नवल शेवाळे, बाग मालक, भांबेड तालुका लांजा .

नवल शेवाळे यांनी सांगितले की, मी दोन दिवसांपूर्वी मुंबई येथून भांबेडगावी आलो होतो. बागेत गेल्यानंतर त्‍यांना एक वेगळा प्राणी दिसला. जो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत होता. सुरूवातीला माकडा सारखा असणारा प्राणी कुतूहल वाढून त्याला कॅमेऱ्यात कैद केले. नवल शेवाळे यांनी चित्रीत केलेली ही चित्रफित भांबेड गावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण हेगिष्टये यांनी वनाधिकारी यांना खात्री करण्यास सांगितले. नवल शेवाळे यांनी वन अधिकाऱ्यांची संपर्क करून हा प्राणी शेकरू असल्याचे खात्री केली. लांजा तालुक्यात शेकरू आढळल्याने एक वन पर्यावरणाची सुखद आणि दिलासा देणारी घटना मानली जात आहे. वनसंपदा आपण जोपासली पाहिजे असेही भाजप जिल्हा उपाध्यक्ष नवल शेवाळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT