रत्नागिरी : दीपक कुवळेकर
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात सध्या सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. विद्यमान आमदार शेखर निकम यांनी कुणबी समाजाला कसे फसवले, याचा पाढा समाजाचे नेते वाचत आहेत. यामुळे सध्या समाजाचे राजकारण चांगलेच पेटले आहे.
'डांबराचा प्लांट यांचाच, खडीचा क्रशर यांचाच, कॉन्ट्रॅक्टर पण यांचेच' हे वाक्य सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत जवळपास सर्वच उमेदवार निश्चित झाले. आहेत.
२९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने त्यानंतर प्रचाराला खरी रंगत येणार आहे. असे असले तरी सध्या सर्वच उमेदवार पायाला भिंगरी लावल्यासारखे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर फोटो तसेच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत.
सध्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाचा विषय ऐरणीवर आला आहे. विद्यमान आमदार शेखर निकम यांनी या समाजाला कसे फसवले, याबाबत समाजाचे नेते बैठका घेऊन सांगत आहेत. या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.
बहुजन भावजे यांनी विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश विधान चर्चेत कसबा येथील बैठकीत केलेले आले आहे. आमदार शेखर निकम यांनी कुणबी कार्यकर्त्याचा कडीपत्त्यासारखा वापर करून घेतला, असा आरोप त्यांनी यावेळी केला. आ. शेखर निकम हे सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उभे राहिले, तेव्हा त्यांना बहुजन विकास आघाडीने जाहीर पाठिंबा दिला.
२०१९ ला बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आ. शेखर निकम यांचा झटून प्रचार करत होते. त्यामुळेच ते निवडून आले. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांना या कार्यकत्यांचा विसर पडला. हे बविआचे कार्यकर्ते कढीपत्त्याप्रमाणे वापरून घेऊन त्यांना वाऱ्यावर फेकले, असा आरोप केला.
ते पुढे म्हणाले की, शासकीय नोकर भरतीत रत्नागिरी जिल्हा हा परप्रांतीयांचा नोकरीचा अड्डा झाल्याचा विषय सद्या ऐरणीवर असताना व रत्नागिरी जिल्ह्यात पवित्र पोर्टलमधून सुमारे पंधराशे शिक्षकांची भरती झाली, त्यात स्थानिक फक्त १४ मुलांचा समावेश होता. हा पवित्र पोर्टलमध्ये झालेल्या भ्रष्टाचार आमदारांनी विधिमंडळात मांडून त्याची चौकशी लावावी, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काहीच घडले नाही. मानधन तत्त्वावरील शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनाने पुन्हा संधी द्यावी, याकरिता १५ ऑगस्टपासून सुमारे नऊ दिवस जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केले होते.
त्या दरम्यान, आ. शेखर निकम हे मुख्यमंत्र्यांसमवेत 'माझी लाडकी बहीण' या कार्यक्रमाला व अभियांत्रिकी महाविद्यालय शामराव पेजे यांचे नाव लावणे, या शासकीय कार्यक्रमासाठी रत्नागिरीत आले होते, मात्र आंदोलनकर्ते उपोषणाला बसले होते, त्यांच्या समोरून जाताना गाडीतून उतरून साधी विचारपूसही केलेली नाही, असे भायजे यांनी सांगितले.
माझ्या आंबव पोंक्षे गावात सुमारे एक कोटी २४ लाखांची १२ रस्त्यांची डांबरीकरणाची कामे गेल्या पाच वर्षांत झाली. ही सर्व कामे त्यांचा पुतण्या प्रथमेश निकम यांनीच केली. डांबराचा प्लांट यांचाच, खडीचा क्रशर यांचाच, कॉन्ट्रॅक्टर पण यांचेच. म्हणजे त्याने आपले उत्पन्न वाढवले. माझा मुलगा तेथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार अभियंता असतानाही त्याला एकही काम मिळालेल नाही, असेही श्री. भाजये म्हणाले.
माझ्या मुलावर हा अन्याय करावा?... तर सर्वसामान्य जनतेचे काय समाजबांधवाचं काय ? असा प्रश्न उपस्थित करून आमदारांच्या या जाचाला कंटाळून शेवटी माझा मुलगा देखील येथील ठेकेदारी काम सोडून मुंबईला नोकरीसाठी निघून गेला, असे भावनिक विचार व्यक्त करताना समोरच्या समाजबांधवांच्या डोळ्यातही पाणी चमकले, असे त्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये स्पष्ट म्हटले आहे.