खेड : शहरातील कातळआळी, वाणीपेठ येथे याच घरात पहाटे आग लागली. Pudhari Photo
रत्नागिरी

Khed house fire: खेडमध्ये भल्या पहाटे घराला आग; अनर्थ टळला

तीन गॅस सिलिंडर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी वेळेवर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

खेड : शहरातील कातळआळी, वाणीपेठ येथे शुक्रवार, दि. 12 रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये घरातील किचनमधील फ्रिज जळून गेले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

किशोर चंद्रकांत विचारे यांच्या दोन मजली कौलारू घरातील किचनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घरात ठेवलेले तीन गॅस सिलिंडर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी वेळेवर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

आगीची माहिती मिळताच खेड नगरपरिषद अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. फायरमन श्याम देवळेकर, फायरमन दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव, सहायक फायरमन जयेश पवार, प्रणव घाग व सूरज शिगवण यांनी संयुक्तरीत्या प्रयत्न करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. नगर परिषद अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला असून, रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT