समुद्र खवळल्याने रत्नागिरीच्या किनारपट्टीवर उंच लाटांचा मारा 
रत्नागिरी

Ratnagiri : समुद्र खवळल्याने रत्नागिरीच्या किनारपट्टीवर उंच लाटांचा मारा

उधाणाचे पाणी काही प्रमाणात रहिवासी भागात

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर जोरदार वार्‍यासह पाऊस पडण्यासह समुद्राला उधाण येऊन उंच लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मांडवी, मिर्‍यासह पंधरामाड किनार्‍यांवर समुद्राच्या उंच लाटा उसळत आहेत. उधाणाच्या भरतीचा तडाखा किनारपट्टीला बसला आहे.

किनारपट्टीसह सर्वत्रच?मंगळवारी समुद्राला उधाण आले. मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कमी असला, तरी हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार किनारपट्टी भागात उधाणाच्या लाटांचा जोर वाढलेला होता. अजस्त्र लाटा किनारी भागात आदळत होत्या. समुद्र खवळलेला असल्यामुळे किनारी भागात उंच लाटा उसळत होत्या. तालुक्यातील काळबादेवी, गावखडी, पूर्णगड आदी भागांत उधाणाचे पाणी काही प्रमाणात रहिवासी भागात शिरले होते. जोरदार लाटांचा प्रहार किनारी भागाला होत होता. मिर्‍या व पंधरामाड परिसरात बंधार्‍यावरून लाटा जमिनीकडे सरकत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT