Mango Park  
रत्नागिरी

Mango Park : शासनाकडून निवेंडीतील ‘मँगोपार्क’साठी ६० कोटींचा निधी

दोन वर्षे रखडलेली भूसंपादन प्रक्रिया मार्गी लागणार

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : तालुक्‍यातील निवेंडी येथे प्रस्‍तावित मँगोपार्क एमआयडीसीसाठी दोन वर्षांपूर्वी घोषणा झाल्‍यानंतर भूसंपादन प्रक्रियाही राबवण्‍यात आली होती. मात्र, निधीअभावी या एमआयडीसीचे भूसंपादन रखडले होते. मात्र शासनाकडून आता निधीचा प्रश्‍न मार्गी लागला असून, ९५ हेक्‍टर जागेसाठी लागणार्‍या १२० कोटींपैकी ६० कोटी रुपये जिल्‍हा प्रशासनाला प्राप्‍त झाले आहेत. त्‍यामुळे निवेंडी एमआयडीसीचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्‍न सुरू झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी निवेंडी येथे मँगोपार्क एमआयडीसी उभारण्‍याची घोषणा शासनाकडून झाली होती. यावेळी निवेंडी पंचक्रोशीतील जागांची मोजणी होऊन भूसंपादन प्रक्रियाही राबवण्‍यात आली होती. त्‍यावेळी १०५ हेक्‍टर जागेचे भूसंपादन केले जाणार होते. मात्र, आता ९५ हेक्‍टरवरती निवेंडी एमआयडीसी उभारणीच्‍या हालचाली सुरू झाल्‍या आहेत.

या एमआयडीसीसाठी राज्‍याचे उद्योगमंत्री आणि जिल्‍ह्याचे पालकमंत्री आमदार उदय सामंत विशेष प्रयत्‍नशील होते. जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा, काजूचे उत्‍पादन होते. या उत्‍पादनावर प्रक्रिया करण्‍यासाठी मोठे प्रकल्‍प या ठिकाणी यावेत, यासाठी त्‍यांचे प्रयत्‍न सुरू होते. फळप्रक्रिया प्रकल्‍प या ठिकाणी झाल्‍यास येथील तरुणांनाही रोजगार उपलब्‍ध होईल, आंबा, काजू व कोकणी मेव्‍यालाही चांगला भाव मिळेल, हा त्‍या मागील हेतू होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT