गणपतीपुळे येथे 12 रोजी अंगारकी यात्रोत्सव 
रत्नागिरी

Ganpatipule Temple news | गणपतीपुळे मंदिरात महाप्रसाद वेळेत वाढ

गॅस टंचाईत देवस्थान समितीचा स्तुत्य निर्णय

पुढारी वृत्तसेवा

गणपतीपुळे : पुढारी वृत्तसेवा आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने गणपतीपुळे परिसरात अनेक हॉटेल्स बंद पडली आहेत. यामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गणपतीपुळे देवस्थान समितीकडून स्वयंभू श्री गणपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या मोफत महाप्रसादाची वेळ वाढविण्यात आली आहे.

त्यानुसार आता दुपारच्या सत्रातील प्रसादाची वेळ दुपारी १२.१५ ते ३, तर सायंकाळच्या सत्रात सायंकाळी ७.१५ ते ८.४५ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. पूर्वी हीच वेळ दुपारी १२.१५ ते २ व सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.१५ अशी होती. दरम्यान, गॅस टंचाईमुळे लाडू प्रसाद सध्या बंद ठेवण्यात आला आहे. लाडू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅस लागतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT