गणपतीपुळे गणपती मंदिरात 19 पासून माघी गणेशोत्सव 
रत्नागिरी

Ganpatipule Maghi Ganeshotsav : गणपतीपुळे गणपती मंदिरात 19 पासून माघी गणेशोत्सव

विविध कार्यक्रमांचे 25 जानेवारीपर्यंत आयोजन

पुढारी वृत्तसेवा

गणपतीपुळे : प्रतिवर्षाप्रमाणे गणपतीपुळे येथील श्री देव गणपती मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 19 ते 25 जानेवारी या कालावधीत हा उत्सव संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.

यानिमित्त देवस्थान समितीकडून अतिशय नेटके नियोजन व आयोजन करण्यात आले असून 19 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत श्रींची महापूजा व प्रसादाने उत्सवाची सुरुवात होणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत गणेशयाग देवता स्थापना करण्यात येणार आहे. 19 ते 23 जानेवारी दरम्यान दररोज सायंकाळी 7 ते 7.30 या वेळेत सामुदायिक आरती व मंत्रपुष्प होणार असून त्यानंतर सायंकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. श्रीपाद ऊर्फ विनोदबुवा खोंड (रा. उमरेड, जि. नागपूर) यांचे कीर्तन या कालावधीत होणार आहे. 20 जानेवारी रोजी माघ शुद्ध द्वितिया दिनी सकाळी 7 ते 12 या वेळेत कलशारोहण व वर्धापनदिनानिमित्त गणेशयागाची पूर्णाहुती होणार आहे. 21 जानेवारी रोजी दुपारी 11 ते 12 या वेळेत सहस्त्र मोदक समर्पणाचा धार्मिक विधी पार पडणार आहे.

22 जानेवारी रोजी माघी यात्रेनिमित्त सायंकाळी 4 ते 6 या वेळेत श्रींची पालखी प्रदक्षिणा (मिरवणूक) काढण्यात येणार असून भाविकांसाठी हा विशेष आकर्षणाचा क्षण ठरणार आहे. 24 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता नमिला गणपती या भावगीते नाट्यगीते व भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अभिषेक काळे (सांगली) व संपदा माने (मुंबई) हे कलाकार सादरीकरण करणार आहेत. 25 जानेवारी रोजी रथ सप्तमीच्या दिवशी सकाळी 11.30 ते दुपारी 2 यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी रात्री 10 वाजता श्रीनिवास भणगे लिखित ‌‘शांतेचं कार्ट चालू आहे‌’ हे धमाल विनोदी नाटक गणेश प्रासादिक नाट्यमंडळ गणपतीपुळे यांच्या वतीने सादर करण्यात येणार असून यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT