गणपतीपुळे ः रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे भाद्रपदी गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. या उत्सवाच्या द्वितीय दिनी श्रींच्या चरणी सहस्त्र मोदक समर्पण विधी सोमवारी मोठ्या भक्तीभावात झाला.
यावेळी संस्थान श्री देव गणपतीपुळे चे विश्वस्त विनायक तुकाराम राऊत यांनी सपत्नीक मनोभावे पूजा आणि सहस्त्रनाम समर्पण केले .यावेळी संस्थान श्री देव गणपतीपुळे चे मुख्य पुजारी प्रभाकर घनवटकर, निलेश घनवटकर, अमित घनवटकर, चैतन्य घनवटकर तसेच विश्वस्त विद्याधर उर्फ उदय शेंडे आणि अनेक भक्तगण उपस्थित होते. या भाद्रपदी उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असून या उत्सवात स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. हा उत्सव मोठ्या भक्तीभावात व उत्साहात संपन्न करण्यासाठी देवस्थानची पंच कमिटी, मुख्य पुजारी व कर्मचारी विशेष मेहनत घेत आहेत.