चिपळुणात रस्‍त्‍यावरून मगरीचा मुक्त संचार  Pudhari Photo
रत्नागिरी

चिपळुणात रस्‍त्‍यावरून मगरीचा मुक्‍त संचार; Video

भर रस्‍त्‍यावर महाकाय मगरीचा फेरफटका अन् नागरिकांत..

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : पुढारी वृत्‍तसेवा

पावसाळा सुरू झाला की चिपळूण शहर परिसरात नदीतील मगरी थेट नागरी वस्तीत संचार करताना दिसून येतात. शहरातून वाशिष्टी आणि शिवनदी वाहते. यामुळे समुद्रातून खाडीत येणाऱ्या मगरी अन्नाच्या शोधात शहर परिसरात फिरताना आढळतात. अशाच प्रकारे शहरात गेल्या तीन चार दिवसांत शिव नदी, पेटमाप आदी नदी किनाऱ्याच्या भागात मगरी थेट रस्त्यावरून संचार करताना आढळून येत आहेत. मगरीचा फेरफटका मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्‍याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक वेळा वन विभागाचे अधिकारी या मगरींना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या अधिवासात सोडून देतात. अशा घटना चिपळूण परिसरात सातत्याने घडत असून, उन्हाळ्याच्या दिवसात मात्र याच मगरी पर्यटकांचे आकर्षण ठरतात. शहरातील गोळकोट बंदर येथे उन्हाळ्याच्या दिवसात क्रोकोडाइल सफारीसाठी पर्यटक देखील येत असतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसात याच मगरी जेंव्हा रहदारीच्या ठिकाणी भर रस्‍त्‍यावरून फिरू लागतात तेंव्हा नागरिकांची भंबेरी उडते. अशा प्रकारे रात्री मगरी रस्‍त्‍यावरून अन्नाच्या शोधात फिरू लागल्‍याने पादचारी नागरिक आणि वाहनधारकांसाठी धोक्‍याचे ठरू लागले आहे.

दरम्‍यान हा रात्रीच्या वेळेचा व्हिडिओ असून, मगर रस्‍त्‍यावरून चालत असल्‍याचे दिसून येत आहे, तर काही लोक वाहनात बसून या मगरीचा व्हिडिओ करत असल्‍याचे दिसून येत आहे. तर एक रिक्षा ड्रायव्हर रिक्षामधून या मगरीचा व्हिडिओ काढत असल्‍याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT