एसटी बस अपघातात ४ प्रवासी जखमी 
रत्नागिरी

Ratnagiri Accident : एसटी बस अपघातात ४ प्रवासी जखमी

स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्‍याने घडली दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

गुहागर शहर : मुक्कामी असलेली कुडली ते चिपळूण एसटी बस बुधवारी सकाळी शीरभाटले आंबेकरवाडी परिसरात अपघातग्रस्त झाली. धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात बसमधील चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.

बुधवारी सकाळी कुडली येथून चिपळूणकडे ही नियमित एसटी बस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली होती. सकाळच्या या बसमध्ये नेहमीप्रमाणे व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी व अन्य प्रवासी मोठ्या संख्येने होते. ही बस शीर भाटले येथील आंबेकरवाडी परिसरात पोहोचली असता, अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याची घटना घडली.

धावत्या बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. काही क्षणांतच बस अनियंत्रित झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. नेमके काय घडले हे समजण्यापूर्वीच बस अपघातग्रस्त झाली. या घटनेत बसमधील चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने अपघाताची तीव्रता अधिक नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT