जनावरांना गुंगीचे औषध देऊन पळवण्‍याचा प्रयत्‍न फसला! 
रत्नागिरी

Ratnagiri News : जनावरांना गुंगीचे औषध देऊन पळवण्‍याचा प्रयत्‍न फसला!

आडे फाटा येथील प्रकार; दापोली पाेलिस ठाण्‍यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

दापोली : आडे फाटा येथे रस्त्यावर फिरणाऱ्या गायी, बैल व पाडी यांना गुंगीचे औषध खाऊ घालून त्‍यांना पळवून नेण्‍याचा अयशस्‍वी प्रयत्‍न जागरूक नागरिकांमुळे उघडकीस आला आहे. याप्रकरणी नूरमोहम्मद इसाक कच्छी व अमन मुर्तुझा घारे यांच्यासह अन्य व्यक्तींविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रमोद अशोक भागणे (वय २९, रा. आंजर्ले-बिरवाडी) यांनी दिलेल्‍या तक्रारीनुसार शुक्रवारी (७ ऑगस्ट) रात्री ११.४५ वाजता प्रमोद भागणे व त्यांचे चुलत भाऊ सुधीर भागणे हे आडे फाटा येथे जात असताना दोन चारचाकी वाहने संशयास्पदरीत्या ये-जा करताना दिसली. वाहनांमधील व्यक्ती रस्त्यावरील जनावरांना काहीतरी खाऊ घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. भागणे यांनी बॅटरीचा प्रकाश टाकताच संबंधित व्यक्तींनी वाहने घेऊन दापोलीच्या दिशेने पलायन केले. काहीवेळाने घटनास्थळी आलेल्या मुलांना काही जनावरे गुंगी आल्याप्रमाणे रस्त्यावर बसलेली व झोपलेली दिसली. यानंतर संशयावरून वाहनांचे क्रमांक पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी शोध घेतला असता दोन्ही वाहने दापोलीतील नशेमन कॉलनी येथे आढळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT