रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : मिरकर वाडा येथील अनधिकृत बांधकामावर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केली आहे. आज (दि.27) पहाटे मत्स्य व्यवसाय विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात ही अनधिकृत बांधकामा हटवण्यास सुरुवात केली. रत्नागिरी सह कोकण किनारपट्टीवरील व्यापारी दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या मिरकर वडा बंदराला अतिक्रमणाने व्यापून टाकलं आहे. त्यामुळे या बंदराचा विस्तारीकरण यामुळे रखडला आहे.
या पार्श्वभूमी वरती राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या पहिल्याच रत्नागिरी दौऱ्यामध्ये या मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाने या संदर्भात येथील 319 अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीसा सुद्धा बजावल्या होत्या. मात्र त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस या अनधिकृत बांधकाम धारकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही कारवाई थांबवावी यासाठी सुद्धा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होते.
मात्र मिरकर वाडा बंदराचा विकास याला प्राधान्य देत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी या अनधिकृत बांधकामाला हटवण्यासाठी प्राधान्य दिल होते. या पार्श्वभूमी वरती अखेरीस शुक्रवार संध्याकाळ पासूनच मत्स्य व्यवसाय विभागाने ही अतिक्रमण हटवण्यासाठी धारकांना आवाहन सुद्धा केलं होतं. त्यानंतर शनिवारपासून काही जणांनी ह्या बांधकाम स्वतःहून हटवली होती तर सोमवारी सकाळी बांधकाम हटवले जातील हेही निश्चित झालं होतं.