gutkha seized: प्रतिबंधित गुटखा जप्त Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri News : ३२ व्‍यावसायिकांना ‘एफडीए’ची नोटीस

१५ आस्‍थापनांवर कारवाई; ६० हजारांचा दंड आणि १२ लाखांचा गुटखा जप्त

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : अन्‍न व औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्ह्यात अन्‍न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, अस्वच्छता आणि बेकायदेशीर अन्‍न व्यवसायांविरोधात एप्रिल महिन्यापासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेत १५१ आस्थापनांची तपासणी केली. या कारवाईत गंभीर त्रुटी आढळल्याने ३२ व्यावसायिकांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर १५ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सहायक आयुक्त ललित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत अस्वच्छता, अन्‍न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व स्वीट मार्टचालकांसाठी मिठाईवर उत्पादन व कालबाह्यता (एक्स्पायरी) तारखेचे लेबल लावणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिबंधित गुटखाविरोधातील मोहिमेत एफडीएने स्वतंत्रपणे सहा कारवायांमधून सुमारे ६ लाखांचा गुटखा जप्त केला. तसेच, पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईत आणखी ६ लाखांचा गुटखा हस्तगत करण्यात आला. अशाप्रकारे एकूण १२ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात प्रशासनाला यश आले. शालेय पोषण आहाराबाबतही प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून २०२० च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT