File Photo  File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : ‘अन्न-औषध’ची चार महिन्‍यांत ८ ठिकाणी कारवाई

जिल्‍ह्यात ६ लाख १४ हजार ४७० रुपयांचे अन्नपदार्थ जप्‍त; ३२ आस्‍थापनांना सुधारणा नोटीस

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : अन्न व औषध प्रशासनाच्‍या वतीने रत्‍नागिरी जिल्‍ह्यात अन्न सुरक्षेच्‍या दृष्टीने विशेष मोहीम राबवून कारवाईचा बडगा उचलला आहे. एप्रिल ते आतापर्यंत ८ ठिकाणी कारवाई करण्यात आली असून, ६ लाख १४ हजार ४७० रुपयांचे अन्नपदार्थ जप्‍त करण्यात आले आहेत. ३२ आस्‍थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. १५१ आस्‍थापनांची पाहणी करण्यात आली.

जिल्‍ह्यातील नागरिकांना चांगल्‍या दर्जाचे अन्न मिळावे म्‍हणून अन्न व औषध विभाग काम करीत असतो. सणाच्‍या काळात अन्नात भेसळचे प्रमाण अधिक असते. त्‍यामुळे अन्न व औषध विभाग सतर्क झाले आहे. एप्रिल, मे, जून व जुलै महिन्‍यात हॉटेल, बेकरी, डेअरीसह विविध आस्‍थापनांची चौकशी करून अन्नाचे नमुने घेण्यात येत आहे. संशयित अन्नाची जप्‍ती करण्यात येत आहे. जिल्‍ह्यातील विविध दुकाने, हॉटेल्‍स व उत्‍पादकांकडून ८९ नमुने गोळा केले आहेत. यापैकी आतापर्यंत ३२ नमुन्यांचे अधिकृत अहवाल प्रशासनाला प्राप्‍त झाले आहेत. तसेच बाजारातील भेसळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पनीर तपासणी मोहीमही राबवण्यात आली. अन्न व औषध विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी काढलेल्‍या नव्‍या आदेशानुसार शाळा, महाविद्यालय परिसरातील जंक फूड विक्री रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्‍याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT