Nilesh Rane File Photo
रत्नागिरी

Nilesh Rane | महामार्गावरील राजापुरात प्रवासी निवारा शेड मंजूर

Nilesh Rane | माजी खासदार नीलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

पुढारी वृत्तसेवा

राजापूर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण वेगाने केले जात आहे; मात्र महामार्गावरील अनेक ठिकाणच्या थांब्यांवर पिकअपशेड उभारण्यात आल्या नसल्याने प्रवाशांना एसटीसह वाहनांच्या प्रतीक्षेसाठी ऊन पावसाच्या झळा सहन करीत रस्त्यावर उभे राहावे लागत आहे.

प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन उन्हाळे गंगातीर्थ येथील ग्रामस्थांनी भाजपपदाधिकाऱ्यांसमवेत छेडलेल्या आंदोलनाची दखल घेत भाजपचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी शासनाकडे महामार्गावर पिकअपशेड उभाराव्यात, अशी मागणी करीत सातत्याने पाठपुरावाही केला.

नीलेश राणे यांचे विशेष प्रयत्न

त्याला अखेर यश येताना मुंबई-गोवा महामार्गावर पिकअपशेड मंजूर झाल्या आहेत. पिकअपशेड उभारणीच्या मागणीसाठी उन्हाळे गंगातीर्थ येथील ग्रामस्थांनी छेडलेले आंदोलन आणि माजी खासदार राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे प्रवाशांसाठी पिकअपशेड मंजूर झाल्याची माहिती भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांनी दिली. मंजूर झालेल्या बांधकामाला प्रत्यक्ष लवकर प्रारंभ होईल असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवनेवार कुमावत यांचेही सहकार्य लाभाल्याचे लांजेकर यांनी सांगितले.

मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले मोठे-मोठे वृक्ष तोडण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी प्रवासी शेड तोडण्यात आल्या.त्याठिकाणी अद्याप शेड उभारलेल्या नाहीत. भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी अभिजीत गुरव, लांजेकर यांच्यासमवेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यां घेरावही घातला होता, त्याची दखल माजी खासदार राणे यांनी घेत निवाराशेड उभारण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश येत राजापुरमध्ये उन्हाळे-गंगातीर्थ, उन्हाळे-आंग्रेवाडी, शासकीय विश्रामगृह राजापूर,हातिवले,टाकेवाडी,कोंडीवळे, खरवले आदि ठिकाणी पिकअपशेड मंजूर झाल्या असून त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे,अशी माहिती लांजेकर यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT