साडवली : देवरुख-कुडवली मार्गांवर नवेलेवाडी ते बौध्दवाडी दरम्यान मुख्य मार्गावर शुक्रवारी सकाळी गव्याचे दर्शन झाल्याने वाहनचालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मठधामापूर व सांगवे गावाला जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे पुर-कुडवली आहे. रस्ता डांबरीकरण असल्याने व वेळ वाचत असल्याने पंचक्रोशीतील वाहन चालक याच मार्गावरून ये-जा करतात. शुक्रवारी सकाळी 10 वाजता मठधामापूर येथील शशांक शिंदे हे टेम्पो घेवून जात असताना कुडवली नवेलेवाडी ते बौध्दवाडी दरम्यान मुख्य मार्गावर गवारेड्याचे दर्शन झाले. मुख्य मार्गावरून ऐटीत हा गवारेडा चालत होता. शशांक शिंदे यांनी समयसूचकता दाखवत टॅम्पो मागे घेतला. गवा जंगलात गेल्यानंतर शिंदे यांनी पुढे मार्गक्रमण केले. मार्गाच्या दुतर्फा झाडी आहे. वाहन चालकांनी ये-जा करताना सतर्क राहणे आवश्यक आहे.