साखरपा येथे मृत अवस्थेत आढळलेला बिबट्या Representive Photo
रत्नागिरी

साखरपा जाधववाडी येथे आढळला मृत्यू अवस्थेतील बिबट्या

या बिबट्याने जाधववाडी परिसरात खळबळ माजवली होती

करण शिंदे

देवरुख, पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरात दहशत माजवलेला बिबट्या शनिवारी (दि.22) जाधववाडी येथे मृत अवस्थेत आढळून आला. याच बिबट्याने दोन दिवसांपूर्वी गावातील युवकावर आणि बांधलेल्या जनावरांवर हल्ला केला होता.

सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हल्ला झालेल्या ठिकाणी सामान काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दुर्गंधी येत होती. याबद्दल त्याने शोध घेतल्यानंतर बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. यानंतर वन विभागाला संपर्क करण्यात आला. तालुका वनअधिकारी तौफिक मुल्ला आपल्या कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी पोचले. त्यांनी प्राथमिक पाहणी करून मृत बिबट्याला बाहेर काढण्यात आले.

यानंतर बिबट्याला देवरुख येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. परिसरातील शेकडो नागरिकांची मृत बिबट्या पाहण्यासाठी गर्दी झाली होती. वनविभाग सोबत पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित झाले होते. मृत झालेला हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे ५ वर्ष इतके त्याचे वय असल्याचा अंदाज आहे. वनविभागाच्या विभागीय अधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वनअधिकारी तौफिक मुल्ला, पोलीस खात्याच्या सहाय्यक निरीक्षक मुजावर मॅडम यांच्यासमवेत सुरज तेली, आकाश कुडूकर,सहयोग कराडे, अरुण माळी आदी कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT