रत्नागिरी

Dapoli Petrol Shortage | दापोलीत पेट्रोल तुटवडा; 6 ही पेट्रोल पंपांवर ‘पेट्रोल नाही’चे फलक

अत्यावश्यक सेवांसह पत्रकारांनाही फटका; पर्यटकांची गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

दापोली : तालुक्यात निर्माण झालेल्या पेट्रोल तुटवड्यामुळे नागरिकांसह अत्यावश्यक सेवांनाही मोठा फटका बसत आहे. शहरातील सहाही पेट्रोल पंपांवर ‘पेट्रोल उपलब्ध नाही’ असे फलक झळकत असल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. रुग्णवाहिका, शासकीय यंत्रणा, आपत्कालीन सेवा तसेच वार्तांकनासाठी सतत प्रवास करणाऱ्या पत्रकारांनाही पेट्रोल मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

उन्हाळी सुट्ट्यांमुळे दापोलीत पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मात्र पेट्रोलअभावी अनेक पर्यटकांना वाहनांसह भटकंती करावी लागत असून काहींना प्रवासातच थांबावे लागत आहे. पेट्रोल पंपांवर सकाळपासून वाहनांच्या रांगा लागत असल्या तरी पुरवठा होत नसल्याने वाहनधारकांना निराश होऊन परत जावे लागत आहे.

पत्रकार, वैद्यकीय सेवा, शासकीय कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र व्यवस्था करून तातडीने पेट्रोल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच तेल कंपन्या आणि प्रशासनाने परिस्थिती गांभीर्याने घेत तातडीने पुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT