दापोलीत थंडीमुळे बागायतदारांना दिलासा Pudhari file photo
रत्नागिरी

Ratnagiri News: दापोलीत थंडीमुळे बागायतदारांना दिलासा

फळांची गुणवत्ता सुधारेल; मोहरधारणेसाठी पोषक वातावरण तयार

पुढारी वृत्तसेवा

दापोली : दापोली तालुक्यात नुकतीच पसरलेली समाधानकारक थंडी शेतकरी आणि बागायतदारांसाठी आनंदाची ठरली आहे. आंबा आणि काजू बागायतदार आता मोहरधारणेच्या उत्सुकतेने भरून आले आहेत. या थंडीत झाडांना विश्रांती मिळते आणि फुलांचे प्रारंभिक टप्पे सुरळीत पार पडण्याची शक्यता वाढते.

स्थानीय बागायतदार अरविंद मांडवकर गाव रुखी हे म्हणाले, या वर्षी थंडी वेळेवर पसरली. आमच्या आंबा व काजूच्या झाडांना योग्य वातावरण मिळाले आहे. काही दिवस अशीच थंडी राहिली तर मोहरधारणा निश्चितच चांगली होईल. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दापोलीसह रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत किमान तापमान सध्या आठ ते नऊ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. या थंडीत झाडे पुन्हा फुलायला सज्ज होतात आणि योग्य वेळेत मोहर येण्याची शक्यता वाढते. थंडी मोहरधारणेस पोषक आहे, मात्र तापमानात अचानक बदल किंवा अति थंडी फळ पिकांना नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

निसर्गाने अशीच साथ दिली तर पुढील आंबा, काजू हंगाम दिलासादायक जाईल. गेल्या दोन-चार वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्ती पिकांना नुकसान पोहोचवत आहे. मोहरधारणा यशस्वी झाल्यास स्थानिक उद्योग आणि शेतकरी दोघांनाही फायदा होईल.
नितीन पाडावे, आंबा उत्पादक शेतकरी, दापोली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT