The building collapsed
शहरातील महाडनाका येथे कोसळलेली येथील जीर्ण इमारत  Pudhari news Network
रत्नागिरी

खेडमध्ये हमदुले चाळीची धोकादायक इमारत कोसळली

पुढारी वृत्तसेवा

खेड : येथील महाडनाका परिसरातील पालेकर हॉस्पिटल शेजारील हमदुले चाळ ही जीर्ण झालेली इमारत धोकादायक म्हणून पालिका प्रशासनाने जाहीर केली होती. मंगळवारी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास ती अचानक कोसळली. मात्र, मे महिन्यातच येथील रहिवाशी दुसरीकडे रहायला गेले होते त्यामुळे जीवित हानी झाली नाही.

शहरातील महाडनाका परिसरातील पालेकर हॉस्पिटल शेजारील हमदुले चाळ ही जीर्ण झालेली इमारत धोकादायक म्हणून नगर परिषद प्रशासनाने जाहीर केली होती. मंगळवारी दि.25 रोजी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास ती अचानक कोसळली. मात्र मे महिन्यातच येथील रहिवाशी दुसरीकडे रहायला गेले होते त्यामुळे जीवित हानी झाली नाही. संबंधित मालकाला जीर्ण इमारतीचा उर्वरित भाग सुरक्षित पणें काढून टाकण्यास सांगणार आल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी ‘पुढारी’ सोबत बोलताना सांगितले.

SCROLL FOR NEXT