Narayan Rane birthday celebration 
रत्नागिरी

Narayan Rane birthday celebration : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आज सिंधुदुर्गात

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याची जोरदार तयारी

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्या'ने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे व इतर लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

'खा. नारायण राणे अमृतमहोत्सवी वर्ष समिती'तर्फे कणकवली येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणचा सर्वांगीण विकास, विशेषतः पर्यटन, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान या सोहळ्यात अधोरेखित केले जाणार आहे. गेले दहा दिवस खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. १० एप्रिल रोजी ते ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये पदार्पण करणार आहेत. वर्षभर कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत. १० एप्रिल २०२७ रोजी खासदार राणे यांना ७५ वर्षे पूर्ण होणार असून त्यावेळी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण असून कणकवली शहरात नरडवे रोड येथे वाढदिवस कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरम्यान संपूर्ण कणकवली शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT