Chiplun Online Fraud | चिपळुणात स्पेअर पार्ट व्यावसायिकाला १० लाखांचा ऑनलाईन गंडा File Photo
रत्नागिरी

Chiplun Online Fraud | चिपळुणात स्पेअर पार्ट व्यावसायिकाला १० लाखांचा ऑनलाईन गंडा

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : शहरातील स्पेअर पार्ट व्यावसायिकाची तब्बल १० लाख २० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी अभय महाजन व प्रियांका सिंग या अनोळखी व्यक्तीेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ मे २०२६ ते २५ जून २०२६ या कालावधीत घडली. या बाबतची फिर्याद स्पेअर पार्ट व्यावसायिक कौस्तुभ अविनाश अभ्यंकर (रा. खेर्डी बाजारपेठ) यांनी चिपळूण पोलिसांत दिली आहे. कौस्तुभ अभ्यंकर यांना फ्रॅन्चायजी घेण्यासाठी अभय व प्रियांका यांनी ऑनलाईन खोटी माहिती पाठवून कंपनीची फ्रॅन्चायजी देतो असे सांगितले. त्यानंतर अभ्यंकर यांनी इंडियन ओव्हरसिज बँक अकाऊंटमध्ये तब्बल १० लाख २० हजार १७४ रूपये ट्रान्सफर केले. मात्र, त्या बदल्यात कोणतीच फ्रॅन्चायजी देण्यात आलेली नाही. शिवाय त्यांचे पैसेही परत मिळालेले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कौस्तुभ यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात ऑनलाईन फसवणुकीची फिर्याद दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT