चिपळूण : शहरातील गोवळकोट रोड परिसरातील अल नजु अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ८ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३० जुलै रोजी दुपारी घडली.
याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार, फिर्यादी नगमा अबीदअली मुजावर (४०, रा. गोवळकोट रोड, चिपळूण) या ३० जुलै रोजी दुपारी १२.३० ते १.४० च्या दरम्यान घराबाहेर गेल्या होत्या. याच कालावधीत चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा हत्याराच्या सहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला.
त्यानंतर बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान, याच सुमारास चिपळूणमधील द्वारका कृष्णकुंज बिल्डिंग, बायपास रोड परिसरातील धनश्री भोसले यांच्या राहत्या घरीही चोरी झाल्याची माहिती फिर्यादीला मिळाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.