Woman Robbed At Bus Station  (File Photo)
रत्नागिरी

Chiplun Bus Stand Theft | चिपळूण बसस्थानकात महिलेची सोनसाखळी लांबविली

Woman Robbed At Bus Station | या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Chiplun Bus Stand Theft

चिपळूण : चिपळूण मध्यवर्ती एसटी आगारात रविवारी सकाळी प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चोरीत चोरट्याने 15 इंच लांबीची, 23 ग्रॅम वजनाची आणि अंदाजे 1 लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. याबाबत शीतल शांताराम चाळके (वय 60, रा. लोटेमाळ, चाळकेवाडी, ता. खेड) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शीतल चाळके या आपल्या भाची रूची संतोष शिर्के (20) हिच्यासोबत दोनवली-गांग्रई एसटी बस पकडण्यासाठी सकाळी 9 च्या सुमारास चिपळूण एसटी स्थानकात आल्या होत्या. बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पलायन केले. या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT