करंबेळेतील व्यावसायिकाने गळफास लावून घेत संपविले जीवन 
रत्नागिरी

Ratnagiri News : करंबेळेतील व्यावसायिकाने गळफास लावून घेत संपविले जीवन

संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील तरुण व्यावसायिक प्रदीप प्रकाश पवार (वय २७) याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या सर्व्हिसिंग रॅम्पच्या शेडमध्ये गळफास घेऊन शुक्रवारी जीवनयात्रा संपवली.

प्रदीप हा शुक्रवारी सकाळी ७.४५ वाजता व्यवसायाच्या ठिकाणी गेला होता. दररोज रात्री ८ वाजेपर्यंत काम आटोपून घरी परतणारा प्रदीप रात्री उशीर झाला तरी घरी न आल्याने त्याचा भाऊ प्रशांत पवार याने त्याला फोन केला. मात्र, फोन उचलला जात नसल्याने शंका येऊन प्रशांत याने रात्री ८.३० वाजता सर्व्हिसिंग रॅम्प गाठले. मात्र, शेडचे शटर बंद होते आणि बाहेर मोटारसायकल उभी होती. शटर उघडून आत पाहिले असता, प्रदीप याने छताच्या लोखंडी पाईपला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतल्याचे आढळले. तातडीने गळफास काढून त्याला खाली उतरवले; परंतु उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. अत्यंत शांत, कष्टाळू आणि गावात प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारा अशी प्रदीपची ओळख होती. त्याचा मित्र परिवार मोठा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT