घरफोडी. file photo
रत्नागिरी

Ratnagiri News : गजमल पिंपळी बु. येथे घरफोडी; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

चिपळूण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी बुद्रूक (गजमल) येथे घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या या कालावधीत घडली.

याबाबत विलास रघुनाथ गजमळ (वय ६१, रा. पिंपळी बुद्रुक, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळी बुद्रुक येथील गजमळ वस्तीतील विलास गजमळ यांच्या राहत्या घराला कुलूप होते. चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाचे कुलूप उचकटून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली. या चोरीमध्ये ३ लाख १० हजार ९११ रुपये किमतीचे ४२.१६५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६ हजार ३२१ रुपये किमतीचे ७४.८०० ग्रॅम चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू असून, घरफोडीच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT