Nurse Transfer Issue pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri BSc Nursing College | रत्नागिरीत यंदापासून बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज सुरू होणार!

Ratnagiri BSc Nursing College | 100 पैकी 76 जागांवर आतापर्यंत प्रवेश पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापाठोपाठ आता बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून सुरू होत असलेल्या या महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून १०० पैकी ७६ जागांवर आतापर्यंत प्रवेश पूर्ण झाले आहेत.

उर्वरित जागांवरील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून लवकरच शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयमुळे भविष्यात जिल्ह्यातील परिचारिका मनुष्यबळ उपलब्धतेला हातभार लागणार आहे. रत्नागिरीतील बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी पहिल्या वर्षी १०० विद्यार्थीची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे.

त्यापैकी ७६ विद्यार्थीनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे उर्वरित जागाही लवकरच भरल्या जातील, अशी अपेक्षा आहे. महाविद्यालयासाठी प्राध्यार्यांसह ६ शिक्षकांच्या पदांना मान्यता मिळाली असून त्यापैकी ४ शिक्षक रुजू झाले आहेत. सध्या या महाविद्यालयसाठी स्वतंत्र इमारत आणि जागेची निवड करण्याची प्रक्रिया होणार आहे.

तोपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे स्वतंत्र पायाभूत सुविधा उभारण्याच्या प्रक्रियेसोबतच शैक्षणिक कामकाज सुरू करण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे. नर्सिंग अभ्यासक्रमात पुढील टप्प्यांवर रुग्णालयातील प्रत्यक्ष प्रशिक्षणाला महत्त्व असते. पहिल्या वर्षानंतरच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणाच्या टप्प्यापासून विद्यार्थ्यांना रूग्णालयीन कामकाजाचा अनुभव मिळणार आहे.

त्यामुळे भविष्यत जिल्हा रूग्णालयातील परिचर्या सेवांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीनेही या महाविद्यालयाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. रत्नागिरीत वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा विस्तारत असताना नर्सिंग महाविद्यालय सुरू होणे, ही आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT