खेड : खेड येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करत कडक कारवाईची केंद्र शासनाकडे विनंती करण्यासाठी तहसीलदार खेड यांना 24 रोजी निवेदन देण्यात आले.
पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात 28 पर्यटक मृत्यूमुखी पडले. या गोष्टीचा सार्या देशाला दुःख असून आतंकवादी व पाकिस्तान सरकार यांचेबाबत जनतेच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. सतत कुरघोड्या करणारे आतंकवादी व पाकिस्तानी यांचे विरोधात केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलावीत सर्व भारतवासीयांचा यांस पाठिंबा असेल. हल्ल्याचा आम्ही सर्व भारतीय एक होऊन निषेध करत आहोत असे निवेदन खेड तालुका भारतीय जनता पार्टी उत्तर व दक्षिण या दोन्ही मंडळाचे वतीने तहसीलदार खेड यांना देण्यात आले.
या प्रसंगी खेड भारतीय जनता पार्टी उत्तर चे अध्यक्ष ऋषिकेश मोरे, दक्षिण मंडळाचे अध्यक्ष विनोद चाळके, जिल्हा चिटणीस भूषण काणे, उदय बोरकर, तालुका सरचिटणीस अजय तोडकरी, संभाजी गोरगावकर, स्वप्नील गुरव आदी उपस्थित होते.