Uday Samant Pudhari
रत्नागिरी

Nanar bauxite public hearing cancelled | नाणारसह परिसरातील बॉक्साईट जनसुनावणी रद्द

नाणारसह परिसरातील बॉक्साईट जनसुनावणी रद्द

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : नाणार व परिसरातील बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधात शेतकरी, आंबा बागायतदार आणि स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर प्रस्तावित जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पाल-कमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षते खाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, राजापूरचे प्रभारी प्रांताधिकारी विश्वजीत गाताडे, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, नगरसेवक विजय खेडेकर यांच्यासह नाणार परिसरातील शेतकरी व आंबा बागायतदार मोठ्छा संख्येने उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले की, "स्थानिक शेतकरी, बागायतदार आणि ग्रामस्थांचा ज्या प्रकल्पाला १०० टक्के विरोध आहे, तो प्रकल्प केंद्र शासनाने लोकांवर लादू नये. पंचायत समिती राजापूस्नेही एकमताने जनसुनावणी रद्द करण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यानुसार प्रशासनाने प्रस्तावित जनसुनावणी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

"त्यांनी पुढे सांगितले की, एक-दोन खातेदार वगळता जवळपास सर्व खातेदारांनी विरोधाची पत्रे जिल्हाधि काऱ्यांकडे सादर केली आहेत. त्यामुळे लोकभावना लक्षात घेऊन प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. पावसाळ्यानंतर मुख्यमंत्री स्तरावर चर्चा करून स्थानिकांचा तीव्र विरोध शासनापर्यंत पोहोचवला जाईल, यांनी स्पष्ट केले. असेही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जीआय मानांकन प्राप्त रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा उत्पादकांच्या हितासाठी झालेल्या बैठकीत कॅनिंग कंपन्यांकडून मिळणाऱ्या दराचा मुद्दाही चर्चिला गेला.

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी एक्झास्टीक कॅनिंग कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून आज पासून आंब्यासाठी ५० रुपये किलो दर देण्यास कंपनीने मान्यता दिल्याची माहिती दिली. रत्नागिरी किंवा देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील आंब्याची विक्री होत असल्याच्या तक्रारींवरून प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिले.

या समितीत पोलीस उपअधीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश असेल. संशयित आंबा वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करून त्या सील करण्याचे अधिकार समितीला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय 'सारथी'चे विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे सुरू करण्या-बाबतही सकारात्मक हालचाली सुरू असल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. सारथीचे व्यवस्थाप कीय संचालक महेश पाटील यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी हा प्रस्ताव शासनाकडे सकारात्मकरीत्या पाठव ण्याची ग्वाही दिली आहे. तसेच विद्या-र्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT