रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी येथील एका आईस फॅक्टरी शेजारी १५० ब्राऊन हेरॉईन या अंमली पदार्थाच्या पुड्यांसह एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवार दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वा. करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली. अरमान लियाकत धामस्कर (२६, रा. जे. के. फाईल, साईभूमीनगर, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. बुधवार दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वा. सुमारास हे पथक एमआयडीसीतून गस्त घालताना त्यांना संशयित ब्राऊन हेरॉईन घेऊन आलेला असताना आढळला.