Aniket Wadkar 
रत्नागिरी

Aniket Wadkar Indian Army Lieutenant| अनिकेत वाडकर याची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड

Ratnagiri - बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी अन् अथक परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय यश

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : सलग तेरावेळा प्रयत्न करूनही यश मिळाले नाही; परंतु त्याने चिकाटी सोडली नाही. अखेरीस चौदाव्या प्रयत्नात सर्व अवघड टप्पे पार करत भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंटपद मिळविण्याचे त्याने स्वप्न पूर्ण केले. रत्नागिरीतील अनिकेत नीलेश वाडकर याचे हे यश तरुणांपुढे आदर्शवत ठरले आहे.

मूळचे सावंतवाडी येथील रहिवासी असलेले व कोकण रेल्वेमध्ये नोकरी करत असल्यामुळे रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेले नीलेश वाडकर व स्नेहा वाडकर या दाम्पत्याचा सुपुत्र अनिकेत वाडकर याने आपल्या परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळवले.

५ सप्टेंबर २०२६ ला एनडीएच्या पासिंग आऊट परेड दिवशी अनिकेत याने भारतीय लष्कराच्या गणवेशात स्वतःला पाहण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी अन् अथक परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळविले.

त्याची भारतीय लष्कराच्या कॉर्पस ऑफ इंजिनिअर या युनिटमध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी गया येथे या प्रवासाला सुरुवात झाली होती.

अनिकेतच्या या यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संरक्षण दलाची ओढ लहानपणापासूनच

लहानपणापासूनच अनिकेतला भारतीय संरक्षण दलाची ओढ होती. सैनिकी गणवेश, शिस्त आणि देशसेवेची भावना यांच्याविषयी त्याला विशेष आकर्षण होते. शालेय जीवनात त्याने एनसीसीमध्ये प्रवेश घेतला आणि संरक्षण दलाच्या वातावरणाशी अधिक जवळून परिचय झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT